आंतरराष्ट्रीय वादात माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती

1 Min Read
माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांचे न्यायाधीशांच्या काळ्या झग्यातील औपचारिक पोर्ट्रेट छायाचित्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) –

युक्रेनमधील सरकारी मालकीच्या ओशाद बँकेसोबतच्या गुंतवणूक करारावरून निर्माण झालेल्या आंतरराष्ट्रीय वादात रशियाकडून भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

‘ग्लोबल आर्बिट्रेशन रिव्ह्यू’ने दिलेल्या वृत्तानुसार, या वादावर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यांचे लवाद न्यायाधिकरण गठित करण्यात आले आहे. कोस्टारिकाच्या मध्यस्थ व माजी व्यापारमंत्री दिहाला जिमेनेझ या तीन सदस्यीय लवाद न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष असतील. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे जिमेनेझ यांची या अध्यक्षपदासाठी निवड केली आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यात १९९८ मध्ये झालेल्या द्विपक्षीय गुंतवणूक कराराअंतर्गत ही आंतरराष्ट्रीय मध्यस्थी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

You Might Also Like

Share This Article
Leave a Comment