बारामती (प्रतिनिधी): येथील बारामती वकील संघटेच्या वतीने “इतिहासाचा एक भाग बना, फिटनेससाठी धावा, एकतेसाठी धावा” या घोषवाक्याने बारामती वकिल मॅरेथॉन २०२६ चे आयोजन २५ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले असल्याचे बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सचिन वाघ यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
बार असोसिएशनच्या इतिहासात प्रथमच, वकील, न्यायिक अधिकारी आणि न्यायिक कर्मचारी यांच्यासाठी विशेष मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ५ व १० कि.मी. मॅरेथॉनचे अंतर राहणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५००/- रूपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे.
या नोंदणीमध्ये प्रीमियम ड्राय फिट इव्हेंट टी-शर्ट, प्रत्येक सहभागीला फिनिशर मेडल, मॅरेथॉननंतर नाश्ता, मार्गावर पिण्याच्या पाण्याची / हायड्रेशनची सुविधा, झुंबा सेशन, व्यावसायिक इव्हेंट फोटोग्राफी, अमर्यादित आनंद आणि फिटनेस याचा लाभ घेता येणार आहे. तरी जास्तीत जास्त न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन बीबीए समीतीच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी ॲड. राज मासाळ, ९७६७३९३७३७, ॲड. महेश आटोळे ९४०५९३५४०५, ॲड. आकाश घारे ९१४६४६८०८४ ॲड. शुभम निंबाळकर ९७६६७४४११० तसेच ॲड. रोहित काटे, ॲड. अमोल वाबळे, ॲड. दीपक घाडगे, ॲड. हर्षद तिकोटे, ॲड. कल्याण राजगुरू, ॲड. स्नेहल मखरे, ॲड. भाग्यश्री जगधणे यांच्याशी संपर्क करावा असेही आवाहन करण्यात आले आहे.


