पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र. २ एएफएस पुणे येथे विद्यार्थी परिषद अलंकरण सोहळा उत्साहात संपन्न

3 Min Read
पीएम श्री केंद्रीय विद्यालय पुणे येथील नवनियुक्त विद्यार्थी परिषद सदस्यांचा शाळेच्या पायऱ्यांवर काढलेला समूह छायाचित्र, विविध रंगांचे गणवेश परिधान केलेले

पुणे : पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र. २ एएफएस पुणे येथे पायाभूत व पूर्वतयारी स्तराच्या विद्यार्थी परिषदेचा अलंकरण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारी, शिस्त, संघभावना, सर्जनशीलता आणि सेवाभाव विकसित करणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

नवनियुक्त विद्यार्थी परिषद सदस्यांच्या आकर्षक आणि शिस्तबद्ध परेड व संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. बालनेत्यांनी आत्मविश्वासाने आणि उत्साहाने संचलन करत शिस्त, समन्वय आणि संघभावनेचे उत्कृष्ट दर्शन घडविले. संपूर्ण विद्यालय परिसरात आनंद, उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना मानाचे बॅज प्रदान करून औपचारिकरीत्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. श्रेयस पलासकर आणि सान्वी देशमुख यांची स्कूल कॅप्टन, तर अधिराज एस. बनसोडे आणि वीरा हजारे यांची स्कूल व्हाइस कॅप्टन म्हणून निवड करण्यात आली.

क्रीडा क्षेत्रातील नेतृत्वाची जबाबदारी तनिष्क सूर्यवंशी आणि श्रेयसी पाटील यांच्याकडे स्पोर्ट्स कॅप्टन म्हणून सोपविण्यात आली. तसेच विद्यथ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता आणि विविध उपक्रमांमधील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सात्विक पाटील आणि प्राची मुंडे यांना (सर्जनशील अध्ययन उपक्रम) कॅप्टन म्हणून जबाबदारी देण्यात आली. यासोबतच हाऊस कॅप्टन, हाऊस व्हाइस कॅप्टन, प्रीफेक्ट्स आणि विद्यार्थी परिषदेतील इतर पदाधिकाऱ्यांनाही बेंज प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थी परिषद शपथविधी. नवनियुक्त बालनेत्यांनी आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पार पाडण्याची, विद्यालयाची मूल्ये व शिस्त जपण्याची, शिक्षक व सहकारी विद्यार्थ्यांचा आदर करण्याची, लहान विद्यार्थ्यांना मदत करण्याची आणि विद्यालयाच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर राहण्याची शपथ घेतली.

विद्यालयात शिवाजी, टागोर, अशोका आणि रमन अशी चार सदने असून त्यांच्या आद्याक्षरांतून ही सुंदर संकल्पना साकारली आहे. चारही सदनांतील कॅप्टन, व्हाइस कॅप्टन, प्रीफेक्ट्स आणि इतर बालनेत्यांनी आपल्या आत्मविश्वासपूर्ण सहभागाने खऱ्या अर्थाने प्रमाणे चमक दाखवली.

विद्यालयाचे प्राचार्य श्री. भारत भूषण यांनी सर्व नवनियुक्त विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. लहान वयात मिळणाऱ्या नेतृत्वाच्या संधींमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, निर्णयक्षमता आणि जबाबदारीची भावना विकसित होते, असे सांगत त्यांनी बालनेत्यांना इतर विद्याथ्यांसाठी आदर्श बनण्याचे आवाहन केले.

मुख्याध्यापक श्री. संजय कुमार पाटील यांनी विद्यार्थी परिषद सदस्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, बॅज हा केवळ सन्मानाचे प्रतीक नसून विद्यालयाने विद्यार्थ्यांवर दाखविलेल्या विश्वासाचे आणि त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीचे प्रतीक आहे. विद्यार्थी नेत्यांनी शिक्षकांचे सहाय्यक हात बनून शिस्त राखण्यासाठी सहकार्य करावे, लहान विद्याथ्यर्थ्यांना मदत करावी आणि स्वतः च्या वर्तनातून इतरांसमोर आदर्श निर्माण करावा. ङ्गखरे नेतृत्व म्हणजे अधिकार नव्हे; तर सेवा, जबाबदारी आणि स्वतःच्या कृतीतून आदर्श निर्माण करणे होय, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

हा सोहळा केवळ बॅज वितरणापुरता मर्यादित न राहता विद्याथ्यांना नेतृत्व, उत्तरदायित्व, सहकार्य, सेवाभाव आणि जबाबदार नागरिकत्व यांची जाणीव करून देणारा अर्थपूर्ण अनुभव ठरला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती नितिका कुमारी आणि श्रीमती मानसी सिंह यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच पायाभूत व पूर्वतयारी स्तरातील सर्व शिक्षकांच्या सक्रिय सहभागामुळे आणि सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.

शिस्तबद्ध संचलन, गौरवपूर्ण बेंज प्रदान सोहळा, शपथविधी आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण विद्यालय परिसर आनंद, अभिमान, उत्साह आणि नेतृत्वभावनेने भारावून गेला.

You Might Also Like

Share This Article
Leave a Comment