जंतरमंतर आंदोलनातील पोलीस कारवाईच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

1 Min Read
जंतरमंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांकडून जमावावर लाठीमार करतानाचा गोंधळाचा प्रसंग, धुरामय वातावरण

नवी दिल्ली-राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान जमावावर झालेला लाठीमार, पेलेट गन आणि इलेक्ट्रिक काठ्यांचा कथित वापर, तसेच साध्या वेषातील पोलिसांची तैनाती या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. सुभाष रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती काम करणार आहे.

या उच्चस्तरीय समितीमध्ये पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती रविशंभर झा, दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती शालिंदर कौर, सीबीआयचे माजी संचालक ऋषिकुमार शुक्ला आणि मेघालयचे माजी पोलीस महासंचालक एल. आर. बिश्नोई यांचा समावेश आहे. आंदोलकांवरील पोलीस कारवाईबरोबरच, आंदोलकांकडून पोलिसांवर झालेला हल्ला आणि सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान या दोन्ही बाजूंची चौकशी ही समिती करणार आहे. समितीचा अंतरिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर पावले उचलली जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

You Might Also Like

Share This Article
Leave a Comment