पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा सन्मान

'अतिउत्कृष्ट सेवापदक' मिळाल्याबद्दल विविध क्षेत्रातून कौतुक

1 Min Read
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे अधिकृत गणवेशातील पोर्ट्रेट छायाचित्र

पुणे: उल्लेखनीय व कर्तव्यदक्ष सेवेसाठी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे अत्यंत मानाचे ‘अतिउत्कृष्ट सेवापदक’ जाहीर झाल्याबद्दल विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याच वेळी उत्कृष्ट सेवेबद्दल सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांचाही सन्मान करण्यात आला.

अमितेश कुमार यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरातील गुन्हेगारीवर वचक निर्माण करणे, अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण करणे यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या या पारदर्शक व तत्पर कार्यपद्धतीमुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा अधिक उंचावली असून, पोलीस दलाबद्दलचा जनतेतील विश्वास वाढला असल्याची भावना सत्कार प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.

या विशेष सत्कार कार्यक्रमासमाजी नगरसेवक अॅड. अय्युब शेख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, बाळासाहेब जानराव, राहुल डंबाळे, मिलिंद अहिरे आणि आबिद सय्यद आदी प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

You Might Also Like

Share This Article
Leave a Comment